माधवनच्या घरात सुवर्णपदकांचा वर्षाव

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आर माधवन याने आपल्या दमदार अभिनयाची जादू सर्वांवर केलीच आहे. तर त्याच्यानंतर आता माधवनचा मुलगा वेदांत माधवन देखील देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहे.वेदांत याने अभिनयाच्या जगापासून दूर क्रीडा क्षेत्रात आपले नशीब आजमावले आहे. नुकतेच आर माधवनने आपल्या मुलाचा हा विजय सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केला आहे. यानुसार आर माधवन […]

माधवनच्या घरात सुवर्णपदकांचा वर्षाव

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आर माधवन याने आपल्या दमदार अभिनयाची जादू सर्वांवर केलीच आहे. तर त्याच्यानंतर आता माधवनचा मुलगा वेदांत माधवन देखील देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहे.वेदांत याने अभिनयाच्या जगापासून दूर क्रीडा क्षेत्रात आपले नशीब आजमावले आहे. नुकतेच आर माधवनने आपल्या मुलाचा हा विजय सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केला आहे. यानुसार आर माधवन याचा मुलगा वेदांत माधवन याने जलतरण स्पर्धेत भारतासाठी तब्बल ५ सुवर्णपदके जिंकली आहेत.

अभिनेता आर माधवन याचा मुलगा वेदांत माधवन हा क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तो नेहमीच आपल्या वडिलांचे तसेच आपल्या देशाचे नाव मोठं करत असतो. वेदांतने अलीकडेच पार पडलेल्या जागतिक स्तरावरील जलतरण स्पर्धेत सहभाग घेत तब्बल ५ सुवर्ण पदकं मिळवली. या चॅम्पियनशिपदरम्यानचे आपल्या मुलाचे काही फोटो शेअर करून अभिनेता आर माधवन याने आपला आनंद व्यक्त केला आहे.
वेदांत ५८व्या MILO/MAS मलेशिया इनव्हिटेशनल एज ग्रुप जलतरण स्पर्धेत सहभागी झाला होता. तर आर माधवनने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये वेदांत तिरंगा आणि मेडलसोबत पोज देताना दिसत आहे.

माधवनने हे फोटो शेअर करत त्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले की,‘देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांसह वेदांतने भारतासाठी ५ सुवर्णपदके पटकावली आहेत. तर आता आर माधवनच्या या पोस्टवर, त्याचे कुटुंब आणि मित्र परिवार शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. एकीकडे अभिनेता आर माधवन दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंतच्या एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने मोठा पडदा गाजवत आहे. तर, दुसरीकडे त्याचा मुलगा अभिमानास्पद कामगिरी करून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number