‘सिडनाज’च्या चाहत्यांवर चिडला सलमान

मुंबई : सुपरस्टार अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपल्या टीमसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहे.अशातच सलमानची अभिनेत्री शहनाज गिल सोबत असलेली मैत्री हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अलीकडेच सलमान आणि या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली होती. यावेळी सलमानने […]

‘सिडनाज’च्या चाहत्यांवर चिडला सलमान

मुंबई : सुपरस्टार अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपल्या टीमसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहे.अशातच सलमानची अभिनेत्री शहनाज गिल सोबत असलेली मैत्री हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अलीकडेच सलमान आणि या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली होती. यावेळी सलमानने ‘सिडनाज’च्या नावाने पोस्ट करणाऱ्या चाहत्यांना खडे बोल सुनावले. सलमानच्या वागण्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

कपिल शर्मा शोमध्ये सलमान शेहनाजसाठी खूप प्रोटेक्टीव्ह होताना दिसला. यावेळी सलमानने नेटकऱ्यांना विचारले की, शहनाजला आयुष्यात पुढे जाण्याचा अधिकार नाही का ? असे म्हणत सलमानने नेटकऱ्यांना फटकारले. या पुढे तो म्हणाला की, ‘सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजला पुढे जाण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे तिचे नाव सिद्धार्थसोबत जोडण्याऐवजी तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू द्या.

सलमान म्हणाला की, सुरुवातीला तो देखील तिला सिडनाज म्हणायचा. पण आता सिद्धार्थ या जगात नाही आणि सिद्धार्थ आता कुठेही असला तरी शहनाजच्या आयुष्यात कोणीतरी यावं, तिने लग्न करावं, ती आयुष्यात यशस्वी व्हावी, असं त्यालाही नक्कीच वाटत असेल.त्यानंतर तो शहनाजला म्हणाला की, ‘या अगदी मूर्खपणाच्या गोष्टी आहेत, कोणाचेही न ऐकता फक्त तुझ्या मनाचे ऐक आणि जीवनात पुढे जा. लग्न कर.’’द कपिल शर्मा शो’मधील सलमान खानची ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहते सलमान खानचे खूप कौतुक करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number