मुंबई : बॉलीवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची जोडी. मागील वर्षी (२०२२) एप्रिल महिन्यात हे दोघे विवाहबंधनात अडकले. नुकतेच त्यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. यासाठी रणबीर आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पत्नी आलियासमवेत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून फक्त एका दिवसासाठी मुंबईत आलेला.
अभिनेता रणबीर कपूर सध्या लंडनमध्ये आपल्या ‘ऍनिमल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तरीही आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी रणबीर लंडनहून फक्त एका दिवसासाठी मुंबईत आलेला. रणबीरचा हा विमानतळावरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रणबीर च्या हातात एक बॅग होती. चाहत्यांच्या मते रणबीरने लंडनवरुन आलियासाठी चॅनल या महागड्या ब्रँडची बॅग खरेदी केली आहे. विशेष म्हणजे ही बॅग तब्बल दहा लाख रुपये किंमतींची आहे.
अभिनेत्री आलियानेदेखील आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रणबीरसोबतचे ३ फोटो शेअर केले होते. यातील पहिला फोटो त्यांच्या हळदीच्या समारंभातील असून दुसरा फोटो मसाई मारा येथे रणबीरने आलियाला प्रपोज केलेल्या क्षणाचा आहे तर तिसरा फोटो एका कार्यक्रमातील आहे. या फोटोंना आलियाने हॅप्पी डे असे कॅप्शन देखील दिले आहे.