पाणीकपातीने हैराण मुंबईकर?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. स्थानिक विभाग कार्यालयातील सहायक आयुक्तांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण मुंबईत सध्या १५ टक्के पाणीकपात लागू आहे. त्याची झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या जगबोगद्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरातील अनेक भागात पाणीकपात करण्यात येतं आहे. याशिवाय, […]

पाणीकपातीने हैराण मुंबईकर?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. स्थानिक विभाग कार्यालयातील सहायक आयुक्तांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण मुंबईत सध्या १५ टक्के पाणीकपात लागू आहे. त्याची झळ नागरिकांना सोसावी लागत आहे.

मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या जगबोगद्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरातील अनेक भागात पाणीकपात करण्यात येतं आहे. याशिवाय, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही अवघे ३२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे खोदकामामुळे हानी पोहोचली. यानंतर या दुरुस्तीसाठी जलबोगद्या बंद करावा लागला. यावेळी पर्यायी मार्ग म्हणून भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचवणे आवश्यक असल्याने ३१ मार्चपासून मुंबई पालिकेने एक महिन्यापासून १५ टक्के पाणीकपात सुरू केली. अनेक भागांमध्ये एक ते दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

‘या’ भागांत ५० टक्के पाणी कपात

वांद्रे, लिकिंग रोड, चॅपल रोड, कलिना, अंधेरी, अक्सा मस्जिद, जोगेश्वरी पूर्वेला, हिल पार्क कॉम्प्लेक्स, मालाड, भंडारपाडा, कुंभारपाडा, राजन पाडा, ओर्लेम चर्च कॉम्प्लेक्स, कांदिवली चारकोप कॉम्प्लेक्स, बोरिवली एक्सर, बोरिवली शिंपोली, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी या भागांत ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number