शिंदे-योगींची होणार भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 50 आमदार यांना घेऊन अयोध्येला जात आहेत. येत्या रविवारी 9 एप्रिल रोजी त्यांचा हा अयोध्या दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुरत आणि गुवाहाटी दौरा गाजला होता. या ठिकाणी ते आपल्या 50 आमदारांना घेऊन ते गेले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी सरकार पाडलं. […]

शिंदे-योगींची होणार भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 50 आमदार यांना घेऊन अयोध्येला जात आहेत. येत्या रविवारी 9 एप्रिल रोजी त्यांचा हा अयोध्या दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुरत आणि गुवाहाटी दौरा गाजला होता. या ठिकाणी ते आपल्या 50 आमदारांना घेऊन ते गेले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी सरकार पाडलं. स्वतः मुख्यमंत्री झाले. शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदार कायम आहेत. त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी जायच असल्यास शिंदे या 50 आमदारांना सोबत घेऊन जात असतात.

आयोध्येत मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्यावेळी ते स्वतः त्यांचे 9 मंत्रीसह सर्व आमदार आणि अपक्ष आमदार यांना घेऊन अयोध्याला जात आहेत. त्यांचा भव्य असा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान ते विमानाने लखनौ येथे रवाना होऊननंतर ते गाडीने पुढे आयोध्येला जातील. यावेळी त्यांचं जंगी स्वागत होणार आहे. लखनौ ते अयोध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फलके देखील लावले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रमधून सुमारे तीन हजार शिंदे यांचे शिवसैनिक अयोध्येत पोहचणार आहेत. तर इतर राज्यातून सुमारे सात हजार शिवसैनिक येणार आहेत. महाराष्ट्र मधून जाणाऱ्या सर्व मंत्री, आमदार, शिवसैनिक यांची सर्व सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी अयोध्येतील हॉटेल आणि धर्मशाळा बुक करण्यात आल्या आहेत. शिंदे आयोध्येत पोहचल्यावर प्रथम ते ‘राम लल्ला’च दर्शन घेतील. त्यानंतर उभारलं जात असलेल्या राम मंदिराची पाहणी करतील. त्यानंतर रात्री शरयू नदीची आरती करतील. मग मुंबईला येतील. उभारल जात असलेल्या राम मंदिरासाठी महाराष्ट्र मधून मोठ्या प्रमाणात टिकवूड पाठवण्यात आलं आहे. ते देखील बांधकामासाठी सुपूर्द करतील. असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव आणि कार्यक्रमाचे आयोजक विराजमुळे यांना विचारलं असता, मुख्यमंत्री शिंदे यांचा एक दिवसाचा अयोध्या दौरा आहे. पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण चिन्ह मिळाल्या बद्दल मुख्यमंत्री ‘रामलल्ला’ला भेट देऊन आशीर्वाद घेणार आहेत, अस त्यांनी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number