‘वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी उत्तर द्या’

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्याबाबतच्या व्हायरल व्हिडिओचे सोमवारी विधानसभेत देखील पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या व्हिडिओमागचा मास्टरमाइंड शोधून काढण्याची मागणी केली. या मुद्यवरून सभागृहात महिला आमदार आक्रमक झालेले पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओप्रकरणी सरकारला निवेदन सादर करण्याचे आदेश दिले. दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी हे निवेदन द्यावे लागणार आहे. […]

‘वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी उत्तर द्या’

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्याबाबतच्या व्हायरल व्हिडिओचे सोमवारी विधानसभेत देखील पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या व्हिडिओमागचा मास्टरमाइंड शोधून काढण्याची मागणी केली. या मुद्यवरून सभागृहात महिला आमदार आक्रमक झालेले पाहून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओप्रकरणी सरकारला निवेदन सादर करण्याचे आदेश दिले. दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी हे निवेदन द्यावे लागणार आहे.

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी म्हात्रे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रा दिली. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उद्धव गटाचा आयटी सेल या मागे असल्याचा आरोप म्हात्रेंनी केला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा असे आवाहन केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारचे दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला देण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number