गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना वाहिली श्रद्धांजली

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलमध्ये श्रद्धांजली वाहिली. यानिमित्ताने रविवारी सेल्युलर जेलमध्ये १०१ दिवे देखील प्रज्वलित करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमा संदर्भात मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटद्वारे त्यांचा अनुभव सांगितला आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकरांना सेल्युलर जेल अंदमान येथे त्यांच्या ५७ व्या ‘समर्पण’ दिनानिमित्त […]

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना वाहिली श्रद्धांजली

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलमध्ये श्रद्धांजली वाहिली. यानिमित्ताने रविवारी सेल्युलर जेलमध्ये १०१ दिवे देखील प्रज्वलित करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमा संदर्भात मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटद्वारे त्यांचा अनुभव सांगितला आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना सेल्युलर जेल अंदमान येथे त्यांच्या ५७ व्या ‘समर्पण’ दिनानिमित्त आदरांजली वाहिली. ज्या कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते आणि त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती त्या कोठडीत जाऊन प्रार्थना करण्यात मला सन्मान वाटतो.” असे ट्विट मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात सावरकरांनी लिहलेले गीत सादर करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पवित्र स्थळांना भेट देता आणि वातावरण अनुभवता आले याचा मला अभिमान आहे. असे सावंत यांनी म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number