‘शिंदेंची जीभ हासडण्याची उद्धव यांची कुवत नाही’

उद्धव ठाकरे यांनी आम्हांला देशद्रोही म्हणाल, तर जीभ हासडून देऊ असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ठाकरेंवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची घाबरगुंडी उडाली होती, असे रामदास कदम म्हणले. तुमची पिवळी झाली होती. […]

‘शिंदेंची जीभ हासडण्याची उद्धव यांची कुवत नाही’

उद्धव ठाकरे यांनी आम्हांला देशद्रोही म्हणाल, तर जीभ हासडून देऊ असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ठाकरेंवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची घाबरगुंडी उडाली होती, असे रामदास कदम म्हणले.

तुमची पिवळी झाली होती. जीभ हासडण्याची हिंमत तुमच्यात आहे का?, अशा तिखट भाषेत उद्धव ठाकरे यांना त्यांनी सुनावले आहे. त्यामुळे आता राजकीय धुळवडीला सुरुवात झाली असून ठाकरे गटाकडून रामदास कदम यांना काय प्रत्युत्तर दिले जाते याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंच्या कालच्या तमाशाला मी १९ तारखेला उत्तर देईन. ठाकरे १०० वेळा खेडमध्ये आले तरी, योगश कदमांना पाडू शकणार नाहीत, असे आवाहनच कदम यांनी ठाकरेंना दिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये रविवारी उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांनीही तितक्याच आक्रमकपणे पलटवार केला आहे. ‘खाऊन खाऊन मजलेत बोके, पन्नास खोके, पन्नास खोके’, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटातील नेत्यांना सतत हिणवलं आहे. त्यालादेखील कदम यांनी प्रत्युत्तर दिले असून खोके तुम्ही घेतले आम्ही नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number