उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाऊन शिवसेना, भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर तुफान फटकेबाजी केली. याविरोधात आता प्रतिक्रिया येऊ लागल्या असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रहार केला आहे. त्यांच्या नाकाखालून ४० आमदार निघून गेल्याने त्यांची निराशा झाली आहे, तेच सभेत दिसलं, असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही हेरलं म्हणून त्यांना चोरलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, नाकाखालून ४० जण निघून घेल्याची निराशा सभेत दिसल्याची टीकाही फडणवीसांना केली. ‘तेच शब्द, तीच वाक्य, तेच टोमणे या व्यतिरिक्त काहीही नवीन यांच्याकडे नाही, खरं म्हणजे त्यांच्या नाकाखालून ४० लोक निघून गेल्याचा संताप आणि निराशा तसेच त्यांच्या भाषणात हताशपणाही दिसून येत होता. त्यामुळे अशा हताश भाषणावर आणि टोमण्यांवर काहीही प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही’. तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडीत आले होते, यावेळी त्यांनी ठाकरेंना प्रतिउत्तर दिलं