‘उद्धव गटाचा घोटाळा उघड केल्याने हल्ला’

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी चार हल्लेखोरांकडून स्टम्पने दादरच्या शिवाजी पार्क परिसरात हल्ला करण्यात आला होता. आता याच हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ते दोनही आरोपी हे भांडूपमधील असल्याचं समजतं आहे. ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या पोलीस दोन्ही […]

‘उद्धव गटाचा घोटाळा उघड केल्याने हल्ला’

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी चार हल्लेखोरांकडून स्टम्पने दादरच्या शिवाजी पार्क परिसरात हल्ला करण्यात आला होता. आता याच हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ते दोनही आरोपी हे भांडूपमधील असल्याचं समजतं आहे. ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत असून इतर दोन संशयितांचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्र सैनिक, सर्व पक्ष्यांच्या नेत्यांचे आभार आहेत. सर्वानी चौकशी केली. परंतु उद्धव ठाकरे गटापैकी कोणाचे फोन आले नाहीत. ते मला ओळखत नाहीत, असं वाटते. मी काल सकाळी फिरायला गेलो होतो. एकाने माल मारलं मग मागे वळून पाहिलं अजून वार करण्याचा प्रयत्न केला मी ओरडलो. त्यानंतर लोक जमा झाले ते पळून गेले. पोलीस तपास करत आहे मुंबई पोलिसांवर विश्वास आहे,असे देशमांडे म्हणाले.

मी भ्रष्टाचार समोर आणला. म्हणून माझे तोंड गप्प करायचे आहे. पण मी काही गप्प बसणार नाही. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. त्यांनी माझ्यावर कोणी हल्ला करायला सांगितले ते समोर आले पाहिजे. उद्धव गटाने आतापर्यंत लोकांना वापरुन घेतले आहे,मारेकऱ्यांकडून जी नावं ऐकली ती नावं मी घेतलेली आहेत. करोना घटोळा उघड केल्याने हल्ला झाल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. भांडूप कनेक्शन यामध्ये समोर आलेलं आहे. पोलीस तपास सुरु आहे, पूर्ण होईपर्यंत यावर बोलणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number