संजय राऊत अडचणीत

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी दुसरा दिवस, संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या याचं वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधिमंडळात जलद गतीने घडामोडी […]

संजय राऊत अडचणीत

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी दुसरा दिवस, संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे.

संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या याचं वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधिमंडळात जलद गतीने घडामोडी घडत असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्षांकडून बुधवारीच हक्कभंग समिती नेमली जाणार आहे. अध्यक्षांकडून १५ सदस्यीय समितीची निवड बुधवारीच होणार आहे. या समितीत सत्ताधारी पक्षाचे १०, तर विरोधी पक्षाचे ५ सदस्य असणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

हक्कभंग समितीचे अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवडीची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. समितीकडून संजय राऊतांना गुरुवारीच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या ४८ तासांच उत्तर द्यावे लागेल,

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी ‘विधिमंडळ नाही, चोरमंडळ’ असा शब्द प्रयोग केला आहे. “ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ. चोर मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो”, असं संजय राऊत म्हणाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number