चौकाचौकात स्वयंघोषित आमदार

पुण्यात रविवारी, २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी कसबा आणि चिंचवड विभागात पोट निवडणूक पार पडली. गुरुवारी २ मार्च, २०२३ रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, निकाल लागण्यापूर्वीच पुण्यात उमेद्वाऱ्यांच्या समर्थकांकडून फलकबाजी सुरु आहे. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. या फलकांद्वारे, अश्विनी जगताप यांची चिंचवड मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाली म्हणून शुभेच्छा […]

चौकाचौकात स्वयंघोषित आमदार

पुण्यात रविवारी, २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी कसबा आणि चिंचवड विभागात पोट निवडणूक पार पडली. गुरुवारी २ मार्च, २०२३ रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, निकाल लागण्यापूर्वीच पुण्यात उमेद्वाऱ्यांच्या समर्थकांकडून फलकबाजी सुरु आहे.

भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. या फलकांद्वारे, अश्विनी जगताप यांची चिंचवड मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाली म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे हे फलक लावण्यात आले आहेत.
यापूर्वी, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे यांच्या नंतर आता भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयाचेही फलक लावण्यात आले आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक घेण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. आता, निकालाआधीच उमेदवारांच्या समर्थकांकडून स्वयंघोषीत विजयाची फलकबाजी सुरु आहे त्यामुळे, २ मार्च रोजी नक्की कोण विजयी होणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number