‘एमआयएम भाजपची बी टीम’

पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान, या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच त्यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ओवेसी यांची पार्टीचं भाजपची बी टीम असल्याचे लोक बोलत असल्याचे राऊत म्हणाले. जिथे भाजपला जिंकायचे असते तिथे ओवेसी जात असतात. त्यामुळे त्यांना राम-श्यामची जोडी म्हणले […]

‘एमआयएम भाजपची बी टीम’

पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान, या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच त्यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ओवेसी यांची पार्टीचं भाजपची बी टीम असल्याचे लोक बोलत असल्याचे राऊत म्हणाले.

जिथे भाजपला जिंकायचे असते तिथे ओवेसी जात असतात. त्यामुळे त्यांना राम-श्यामची जोडी म्हणले पाहिजे असे राऊत म्हणाले. शनिवारी असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत, ते कधीही एकत्र येऊ शकतात अशा शब्दात त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाण्यातील मुंब्र्यात जाहीर सभेत ते बोलत होते.

संजय राऊत त्यावेळी ते म्हणाले की, भाजप आणि ओवैसी म्हणजे राम आणि श्यामची जोडी असल्यासारखे आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. जिथे निवडणूक असते आणि भाजपला त्यांची गरज भासते तिथे ओवेसी हजर होतात. त्यामुळे भाजप आणि ओवेसी हीच खरी राम आणि श्यामची जोडी शोभते, असं म्हणत राऊतांनी ओवेसी यांच्यावर टीका केली. नवी मुंबईत एमआयएमचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. यानिमित्ताने एमआयएमचे नेते सध्या मुंबईत आहेत. याच कार्यक्रमात ओवेसींनी शिंदे आणि ठाकरे हे राम-श्यामची जोडी असल्याचा आरोप केला होता. त्याला खासदार राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number