गोगावलेंकडून ५५ आमदारांना पक्षादेश

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सत्ताबदल झाल्यावरचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला पक्षादेश बजावण्यास आणि कारवाई करण्यास मनाई केलेली असतांना शिवसेनेचे प्रतोद भरद गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पक्षादेश बजावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना […]

गोगावलेंकडून ५५ आमदारांना पक्षादेश

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सत्ताबदल झाल्यावरचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला पक्षादेश बजावण्यास आणि कारवाई करण्यास मनाई केलेली असतांना शिवसेनेचे प्रतोद भरद गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पक्षादेश बजावला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर या पक्षाने सर्व ५५ आमदारांना रविवारी पक्षादेश म्हणजे व्हिप बजावला आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आदेश देखील दिले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे गटातील आमदार या पक्षादेशाचे पालन करतील का ? या कडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिंदे गटाकडे ४० आणि ठाकरे गटाकडे १५ असे शिवसेनेचे विधानसभेत ५५ आमदार आहेत. कोणी कोणावर बजावावा, हा शिवसेनेच्या दोन्ही गटांत वादाचा मुद्दा बनला आहे. याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पुढील दोन आठवडे कोणीही म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटाने पक्षादेश बजावता कामा नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या ४० आमदारांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पातील काय रणनीती आखावी यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व ४० आमदारांना अधिवेशना संदर्भात सूचना केल्या. यावेळी शिवसेनेच्या सर्व आमदारांना पक्षादेश बजावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number