‘अदाणी आणि मोदी एकच’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अडाणी मुद्द्यावरुन जोरदार प्रहार केला आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे काँग्रेसचं ८५वं अधिवेशन सुरु आहे. आज या अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसह गौतम अदाणी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना […]

‘अदाणी आणि मोदी एकच’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अडाणी मुद्द्यावरुन जोरदार प्रहार केला आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे काँग्रेसचं ८५वं अधिवेशन सुरु आहे. आज या अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसह गौतम अदाणी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना केंद्र सरकारवर टीका केली. तसेच भारत जोडो यात्रेतील त्यांच्या अनुभव सुद्धा सांगितला.

गौतम अदानी यांच्याबद्दल अवघे जग प्रश्न विचारत आहे. संसदेतही आम्ही प्रश्न उपस्थित केले. पण, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही उत्तर न देता मौन बाळगतात. पण आम्ही मागे हटणार नाही. उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारतच राहणार असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. ते रायपूर येथील काँग्रेस अधिवेशनात बोलत होते. या वेळी त्यांनी संसदेत उपस्थित केलेल्या अदानींच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांनाही जोरदार फटकारले.

देशातील सगळा पैसा फक्त एकाच व्यक्तीकडे जात आहे. देशातील विमानतळे, बंदरे, संरक्षण साहित्ये, पायाभूत सुविधा, ऍग्रीकल्चर स्टोरेज हे सर्व पैसे एकाच व्यक्तीच्या हातात जात आहे. आणि जेव्हा आम्ही पंतप्रधानांना विचारतो कि अदानी ६०९ क्रमांकावरून दुसऱ्या नंबर वर कसे आले? तुमचं आणि त्यांचं नातं काय आहे ? तेव्हा संसदेत आमचा आवाज बंद केला होता. भाजप आणि आरएसएसला अदानींना संरक्षण देण्याची गरज का भासत आहे? असा सवालही राहुल गांधींनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number