‘देशद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली’

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारी चहापानावर बहिष्कार घातल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार जाहिरातीवर वारेमाप खर्च करत आहे. विकासकामांऐवजी उधळपट्टी सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील जेवणाचे बिल २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. एवढे बिल […]

‘देशद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली’

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारी चहापानावर बहिष्कार घातल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार जाहिरातीवर वारेमाप खर्च करत आहे. विकासकामांऐवजी उधळपट्टी सुरू आहे.

गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील जेवणाचे बिल २ कोटी ३८ लाख रुपये आले आहे. एवढे बिल कसे काय आले? सरकार चहामध्ये सोन्याचे पाणी घालते का?, असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची बैठक रविवारी विधान भवनात झाली. त्यानंतर अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याचे सांगितले.

अजित पवार म्हणाले,’राज्य सरकारची गेल्या आठ महिन्यातली अवस्था परिस्थिती बघितली तर, राज्याचे मुख्यमंत्री हे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचं रक्षण करण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याची ताकद, क्षमता नाही. राज्याबाहेरील शक्तींच्या आदेशाने मुख्यमंत्र्यांचा कारभार चालू आहे. स्वविचाराने निर्णय घेण्याचा निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही. अशा नामधारी, घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला, आज संध्याकाळी चहापानाला बोलवलं होतं. त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं, हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता. राज्यातील जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती. त्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं, आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळं सरकारच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आहे.’ असे अजित पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number