संजय राऊतांवर गुन्हा दाखल

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तुरुंगातून गुंडांना सोडवून टास्क दिला जातोय असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. हा गौप्यस्फोट करताना राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केला. या आरोपांनतर संजय राऊत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खासदार […]

संजय राऊतांवर गुन्हा दाखल

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तुरुंगातून गुंडांना सोडवून टास्क दिला जातोय असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. हा गौप्यस्फोट करताना राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केला.

या आरोपांनतर संजय राऊत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी संजय राऊतांविरोधात ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे, असाही आरोप मिनाक्षी शिंदेंनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावरील हल्ल्याची सुपारी ठाण्यातील गुंडांना दिली असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक कार्यकर्ता असलेल्या राजा ठाकूर याला सुपारी दिली असल्याचा दावा राऊतांनी तक्रारीत केला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number