उद्धव गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसलेंवर हल्ला

चिंचवड पोटनिवडणुकीतील मविआचे उमेदवार नाना काटे यांच्या बुधवारी प्रचारादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. शिवसेना उद्धव गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात भोसले यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली सध्या त्यांच्या चिंचवड येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी नाना काटे यांचा सचिन भोसलेंसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेरगाव परिसरात घरोघरी जाऊन प्रचार […]

उद्धव गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसलेंवर हल्ला

चिंचवड पोटनिवडणुकीतील मविआचे उमेदवार नाना काटे यांच्या बुधवारी प्रचारादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. शिवसेना उद्धव गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात भोसले यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली सध्या त्यांच्या चिंचवड येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी सायंकाळी नाना काटे यांचा सचिन भोसलेंसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेरगाव परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करत होते. त्यादरम्यान काही अज्ञात व्यक्ती तिथे आले आणि भोसलेंसह कार्यकर्त्यांना मारहाण करू लागले. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप सचिन भोसले यांनी केला आहे.

थेरगाव येथील मंगल नगर येथे बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. थेरगाव येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारावेळी भोसले आणि त्यांचा वाहनचालक यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. यात भोसले आणि पाषाणकर यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सचिन भोसले यांना फोन करून धीर दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number