कमला नगर झोपडपट्टीत आग; 25 घरे खाक

मुंबईच्या धारावी शाहूनगर परिसरात असलेल्या कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शाहूनगर परिसरातील २५ हून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आली. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात […]

कमला नगर झोपडपट्टीत आग; 25 घरे खाक

मुंबईच्या धारावी शाहूनगर परिसरात असलेल्या कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शाहूनगर परिसरातील २५ हून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आली. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. परिसरात सध्या फायर कुलिंगचं काम सुरू आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

या भीषण आगीत २५ घरं जळून खाक झाली आहेत. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कमला नगर झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी २० ते २५ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. याशिवाय या ठिकाणी अनेक लहान दुकानंही आहेत. ज्या परिसरात आग लागली, त्या परिसरात लेदरची अनेक दुकानं आहेत. तसेच, अनेक लहान-मोठे कपड्यांचे कारखानेही आहेत. त्यामुळे आग आणखी वाढत होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number