नवा गडी, नवं राज्य

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर प्रथमच शिंदे गटाने अधिकृत शिवसेना पक्षाची कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी नव्हे तर पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आहे. शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख पद गोठवले आहे. नव्या रचनेत बाळासाहेबांच्या पदाला स्पर्श नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली […]

नवा गडी, नवं राज्य

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यानंतर प्रथमच शिंदे गटाने अधिकृत शिवसेना पक्षाची कार्यकारणीची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी नव्हे तर पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आहे. शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख पद गोठवले आहे. नव्या रचनेत बाळासाहेबांच्या पदाला स्पर्श नाही.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. एकनाथ शिंदे यांची मुख्य नेते म्हणून पुन्हा निवड करतानाच; आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती ४५ जागा, तर विधानसभा निवडणुकीत २०० जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुखपदी शिंदे यांची निवड न करता मुख्यनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र शिंदे यांच्याकडे पक्षाचे सर्व अधिकार असणार आहेत.

पुन्हा एकदा भूमिपूत्रांच्या नोकऱ्यांबाबतचा ठराव संमत करून घेण्यात आला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ठाकरे कुटुंबियांशिवाय पार पडली. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे सायंकाळी ८ वाजता ही बैठक पार पडली. शिंदे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. या वेळी राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी, खासदार, आमदार बैठकीस उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने एकनाथ एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निवाडा केल्यानंतर आज शिवसेनेची पहिल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेन्सी येथे पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

शिस्तभंग समितीची स्थापना या बैठकीमध्ये शिवसेना पक्षाची शिस्तभंग समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी मंत्री दादा भुसे तर मंत्री शंभुराज देसाई आणि संजय मोरे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number