अखेर ‘ते’ पत्र मिळालं

संसदेतील शिवसेना कार्यालयदेखील शिंदेंच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसे पत्र उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी खासदार राहुल शेवाळेंना दिले आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल शेवाळेंना पत्र पाठवून शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा दिला. याआधी दोन्ही गटाकडून हे कार्यालय वापरात असले तरी शिंदेंकडून हे कार्यालय त्यांना मिळावे अशी मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर काल विधीमंडळातील कार्यालय शिंदे […]

अखेर ‘ते’ पत्र मिळालं

संसदेतील शिवसेना कार्यालयदेखील शिंदेंच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसे पत्र उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी खासदार राहुल शेवाळेंना दिले आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल शेवाळेंना पत्र पाठवून शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा दिला. याआधी दोन्ही गटाकडून हे कार्यालय वापरात असले तरी शिंदेंकडून हे कार्यालय त्यांना मिळावे अशी मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर काल विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात गेले तर आज संसदेतील कार्यालय शिंदेंच्या ताब्यात गेले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर संसदेतील हे कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत आहे. या वादादरम्यान दोन्ही गट या एकाच पक्ष कार्यालयात बसत होते. पण आता ही मालकी पूर्णपणे लोकसभा सचिवालयाने शिवसेना शिंदे गटाला दिली आहे. संसदेतील शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले आहे. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांबाबत महत्त्वांचे वक्तव्य केले आहे. आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतल्यानंतर या चर्चा आणखीच जोर पकडू लागल्या होत्या. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांबाबत महत्त्वांचे वक्तव्य केले आहे. आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र आम्हाला कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर आम्हाला दावा करायचा नाही. आम्हाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number