कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने राजकीय वातावरण आरोप- प्रत्यारोपाने तापू लागले आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, नाना पटोले आदींनी पदयात्रा, दुचाकी रॅली, सभेतून प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात उमेदवार हेमंत रासने यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यामुळे ही लढत एकतर्फी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही जागा कायम राखण्यासाठी भाजपकडून सर्व प्रकारचे उपाय योजले जात आहे. त्याचवेळी प्रचारावर जोर दिला जात आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. या पदयात्रेला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. पालखी चौक येथून सुरू झालेली प्रचार यात्रा वटेश्वर, गाडीखाना, शिवाजी महाराज रस्त्याने आंग्रे वाडा येथे समाप्त झाली. समारोपप्रसंगी मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या.
कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप- युतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पदयात्रेत पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागले आहेत, असे सांगून मुंडे म्हणाल्या, स्थिर सरकार आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदार भाजपालाच मतदान करेल. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रासने प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या