अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात असणार […]

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात असणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी दिल्लीहून पोलिसांचे विशेष पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाआरतीनिमित्त महानगरपालिका प्रशासनाने पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता, तसेच किरकोळ डागडुजी सुरू केली आहे. कणेरी येथील सिद्धगिरी मठाच्या वतीने रविवारी पंचगंगा नदीच्या काठावर महाआरतीचे आयोजन केले आहे. पंचगंगा नदीची महाआरती यापूर्वी अनेक वेळा झाली असली तरी यावेळची महाआरती ही भव्य असणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार या महाआरतीत सहभागी होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number