रमेश बैस यांनी मराठीतून घेतली शपथ

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शनिवारी शपथबद्ध झाले आहेत. दरबार हॉल मध्ये त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला यांनी शपथ दिली आहे. महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून ते आता पाहणार आहे. रमेश बैस यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त […]

रमेश बैस यांनी मराठीतून घेतली शपथ

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शनिवारी शपथबद्ध झाले आहेत. दरबार हॉल मध्ये त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला यांनी शपथ दिली आहे. महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून ते आता पाहणार आहे. रमेश बैस यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली आहे.

महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात तीव्र लाट उसळली होती. अखेर कोश्यारी यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा 12 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर बैस हे शुक्रवारी प्रथमच मुंबईत आलेत.

रमेश बैस हे राज्याचे 14वे राज्यपाल म्हणून नियुक्त होणार आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. रमेश बैस हे तब्बल सात वेळा खासदार राहिले आहेत. बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. 1978 मध्ये सर्वात आधी नगरपालिकेत निवडून गेले होते. यानंतर 1980 ते 1984 मध्ये आमदार म्हणून मध्यप्रदेश विधानसभेत ते निवडून गेले होते. रमेश बैस हे मूळचे रायपूरचे आहेत. 1989 मध्ये रायपूरमधून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. तेव्हापासून एकूण 7 वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

संसदीय राजकारण, समाजकारण आणि संघटनात्मक कार्याचा 5 दशकांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री आणि राज्यपाल पदापर्यंत सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number