राणेंच्या बालेकिल्ल्यात राऊतांचे फलक

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज कोकण दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी संजय राऊत यांचे ठिक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. संजय राऊत हे बऱ्याच दिवसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या अभूतपूर्व राजकीय भूकंप आणि सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्याला येत आहेत. संजय राऊत यांच्या या दौऱ्यादरम्यान […]

राणेंच्या बालेकिल्ल्यात राऊतांचे फलक

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज कोकण दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी संजय राऊत यांचे ठिक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. संजय राऊत हे बऱ्याच दिवसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या अभूतपूर्व राजकीय भूकंप आणि सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्याला येत आहेत.

संजय राऊत यांच्या या दौऱ्यादरम्यान ठाकरे गटाचा शक्तीप्रदर्शनाचा देखील प्रयत्न असणार आहे. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी संजय राऊत यांचे ठिक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. पण हे बॅनर चांगलेच चर्चेत आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने थेट आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.

बॅनरवर संजय राऊत यांचा फोटा आणि त्यासोबत ‘इलाका तेरा धमाका मेरा’ असा इशारा देण्यात आलेली वाक्य लिहिण्यात आली आहेत. या बॅनर्समुळे कणवलीत शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून हे बॅनर्स काढले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number