कोश्यारींना निरोप

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ते आज त्यांच्या गावी म्हणजेच आज देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत. आज त्यांना निरोप देण्यात आला. राजभवनावर त्यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आज महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

कोश्यारींना निरोप

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ते आज त्यांच्या गावी म्हणजेच आज देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत. आज त्यांना निरोप देण्यात आला. राजभवनावर त्यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आज महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांची भेट घेऊन निरोप देऊन त्यांचे आभार मानले. रमेश बैस यांची राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल तसेच प्राची जांभेकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.

भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. त्यानंतर 12 फेब्रुवारीला अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number