धान्यातील पावडर ठरली जीवघेणी

कराड येथील चिमुकल्या सख्ख्या बहीण – भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्यांना त्रास झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.श्लोक वय वर्षे ३ आणि तनिष्क अरविंद माळी वय वर्षे ७ अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून […]

धान्यातील पावडर ठरली जीवघेणी

कराड येथील चिमुकल्या सख्ख्या बहीण – भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्यांना त्रास झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.श्लोक वय वर्षे ३ आणि तनिष्क अरविंद माळी वय वर्षे ७ अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता. या उग्र वासामुळेच श्लोक आणि तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर त्यामध्ये अंतर्गत अति रक्तस्त्राव आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. तर तनिष्काचे मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number