ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सैयदना मुफद्दल सैफुद्दिन यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे देखील सोबत होते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी बोहरा समाजाच्या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन केले होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी दाऊदी बोहरा समाजाने मरोळ येथे उभारलेल्या संकुलाबद्दल कोतुक केले. मुंबईतील एक प्रभावी अल्पसंख्यांकांपैकी दाऊदी बोहरा समाज आहे, मोदींनी मुंबई दौऱ्यात या समाजाचे कौतुक केले होते. त्यानंतर आज ठाकरे यांनी देखील दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतली.बोहरा समाजाचे लोक सामान्य मुस्लिमांपेक्षा थोडे वेगळे आहेत. बोहरा समाजाची लोकसंख्या जवळपास २० लाखांहून अधिक अधिक असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कोलकाता, चेन्नई तसेच परदेशात देखील या समाजाचे लोक राहतात.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याच अकादमीच्या उद्घाटनाला आले होते, त्यावरून उध्दव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपवर टीका देखील केली होती. त्यावेळी ठाकरे म्हणाले होते, बोहरा समाजाच्या विरोधात मी नाही, ते चांगले लोक आहे. मी तेथे गेलो असतो आणि त्यांना चांगले म्हटले असते तर मी हिंदुत्व सोडले अशी टीका झाली असती.