पुणे – शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये सुरळीत पार पडली. यामध्ये पाचवीच्या परीक्षेसाठी ९६ टक्के आणि आठवीच्या परीक्षेला ९७ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यामुळे परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती परीक्षा परीषदेच्या वतीने देण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी फेब – […]

पुणे – शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये सुरळीत पार पडली. यामध्ये पाचवीच्या परीक्षेसाठी ९६ टक्के आणि आठवीच्या परीक्षेला ९७ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यामुळे परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती परीक्षा परीषदेच्या वतीने देण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी फेब – वारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.

यंदा राज्यातून इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीच्या एकूण ९ लाख ५६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ८५७ तर आठवीच्या ३ लाख ६७ हजार ७९६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात काम पाहणाऱ्या स्मिता गौड या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ३८ जिल्ह्यांमधील ४२९ तालुक्यांमध्ये ५२ हजार ५३६ शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. यामध्ये परीक्षा वेळेत झाली असून, कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number