‘गळ्यात पट्टा घालून काहीजण भाजपसोबत गेले’

गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील नाहर निकेतन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांसोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला,.भाजपसोबतच्या युतीबाबत विषय आमच्यातले काही लोकं गळ्यात पट्टे घालून भाजपसोबत गेले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच मी मराठी-अमराठी असं काही मानत नसून मी मला तुमची साथ हवी आहे असंही उद्धव ठाकरे थेट म्हणाले. […]

‘गळ्यात पट्टा घालून काहीजण भाजपसोबत गेले’

गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील नाहर निकेतन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांसोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला,.भाजपसोबतच्या युतीबाबत विषय आमच्यातले काही लोकं गळ्यात पट्टे घालून भाजपसोबत गेले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच मी मराठी-अमराठी असं काही मानत नसून मी मला तुमची साथ हवी आहे असंही उद्धव ठाकरे थेट म्हणाले.

‘प्रत्येक भारतीयांच्या मनात आता एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर त्यांना हवंय, की तुमचं हिंदुत्व नेमकं काय आहे? एकमेकांचा द्वेष करणे हेच हिंदुत्व आहे का?’ असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ‘आम्हाला सर्वसामान्यांच्या मनातील देश निर्माण करायचा आहे. तसेच गळ्यात पट्टा घालून आमच्यातलेच काहीजण भाजपसोबत गेल्याचे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

उत्तर भारतीयांशी बोलताना मन की बात नको, दिल की बात हवी, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. उत्तर भारतीयांशी नातं मजबूत करायला आलो असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ऐकमेकांचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे, असंही ते म्हणाले.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी चांगला आहे. राम मंदिरासाठी देखील आम्हीच प्रयत्न केले. भाजपचे सध्या तोडो, फोडो आणि राज्य करा हे राजकारण आहे. राष्ट्रीयत्त्व हेच आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेबांनी हिंदू, मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही’. शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यांच्या या गोष्टीवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले,

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number