राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्याने झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार आहेत. त्यावर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले,’राज्याच्या जनतेने राज्याच्या राजकीय पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटनांनी एक भूमिका घेतली आणि राज्यपालांच्या विरोधामध्ये या राज्यामध्ये प्रथमच लोक रस्त्यावर उतरली राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केली. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारशी नाकारण्यात आल्या, राज्यपाल हे दबावाखाली काम करत होते आता नवीन राज्यपाल हे राज्याला मिळाले आहेत त्यांचं नाव बैस आहे की बायस आहे माहित नाही नवीन राज्यपालांचा आम्ही स्वागत करतो पण महाराष्ट्राची मागणी ही राज्यपाल बदला संदर्भात अनेक वर्षांपासून आहे.
तात्काळ राज्यपालांना हटवणं गरजेचं होतं पण केंद्र सरकारने ते केलं नाही राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला आणि सामुदायिक बदल्यात झाल्या त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा घेतला. भाजप आणि केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पाठीशी घातल याची इतिहासात नोंद राहील नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं राजभवनाचे भाजप कार्यालय बनबु नये. सरकार घटनाबाह्य आहे याचं भान राज्यपालांनी ठेवावं’ असे राऊत म्हणाले.