भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आली होती. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले त्यावर आता शिंदे गटाचे नेते अंबादास दानवे ट्विट करत यांनी फडणवीसांच्या टीकेवर पलटवार केला आहे.
अंबादास दानवे म्हणतात,’देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारवर टीका केली. त्या अडीच वर्षात दोन वर्षे ही कोरोनाची होती, याचा विसर त्यांना पडला. महाराष्ट्रात प्रेतं तरंगली नाहीत, हे सांगायला मात्र ते विसरले. उत्पन्न थांबलेले असताना मविआने समृद्धीच्या कामात अडथळा नको म्हणून ७ हजार कोटी रुपये दिले होते. तसेच ते पुढे म्हणाले, योजनांचा पाढा वाचताना मात्र उज्वला योजनेतून गॅस घेणारे किती ग्राहक आज सिलिंडर न घेता पुन्हा चुलीकडे वळले आहेत, याचाही लेखाजोखा एकदा घ्या! मुद्रा योजनेत वाटलेले जनतेचे पैसे किती प्रमाणात बँकेत परतफेडीच्या रूपाने परत आले, हे पण तपासा असे ट्विट दानवे यांनी केले.