मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. कणेरी मठ इथं होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आहेत. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान पंचमहाभूत लोकोत्सव होणार आहे. पंचमहाभूत लोकोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येण्याची शक्यता आहे. लोकोत्सव कार्यक्रमासाठी आठ राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणेरी मठ येथील कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
या महोत्सवात जल, अग्नी, वायू, पृथ्वी व आकाश या तत्वाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डोमची पाहणी करुन श्री. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून माहिती घेतली. तसेच हा उत्सव आयोजनाचा उद्देश व या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाची रुपरेषा राव यांनी जाणून घेतली. तसेच शासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. आरोग्य आणि संस्कार यासंबंधी स्वतंत्र दालने असतील. एकाचवेळी १० हजार नागरिक कार्यक्रम पाहू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. याशिवाय शेती अवजारे, बी- बियाणे आणि महिला बचत गटांचे मिळून एक हजारहून अधिक स्टॉल असतील.