पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालं आहे. ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान ही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केले. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना माला खूप आनंद होत आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वे आणि मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी मोठा दिवस आहे. या दोन्ही वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या देशातील मोठ्या शहरांना जोडणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल, अशा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
“देशातील 17 राज्यांती 108 जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले आहेत. देशात आज नवीन विमानतळ, वंदे भारत एक्सप्रेस आणि मेट्रोचं जाळं वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” तसेच पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात दहा लाख कोटी सुविधांची तरतूद केली आहे. पायाभूत सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधान यांनी महाराष्ट्राचा विकास डबल इंजिन सरकारमुळे होत आहे असे बोल्ट शिंदे-फडणवीसांचं कौतुक केले आहे.