पंतप्रधान मोदी आज मुंबईत

मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून मुंबईत भाजपची सत्ता मिळविण्याचा निर्धार केलेल्या पक्षाने देखील यावेळी वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला आहे. या भेटीत मोदी दोन वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व येथील संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. […]

पंतप्रधान मोदी आज मुंबईत

मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून मुंबईत भाजपची सत्ता मिळविण्याचा निर्धार केलेल्या पक्षाने देखील यावेळी वातावरण निर्मिती करण्यावर भर दिला आहे. या भेटीत मोदी दोन वंदे भारत गाडय़ांना हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व येथील संकुलाचे उद्घाटन करणार आहेत.

देशात एकाच वेळी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यातील एक ट्रेन मुंबई ते साईनगर शिर्डी आणि दुसरी सोलापूर अशी चालवली जात आहे. एकाच वेळी दोन वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 16 डब्यांच्या या गाड्यांमध्ये 1,128 प्रवासी प्रवास करू शकतात. मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील. सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी धावणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number