शरद पवार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे त्रैवार्षिक अधिवेशन शुक्रवारी गोल्फ क्लब मैदानावर दुपारी साडेबाराला होणार आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला त्यांनी उपस्थिती लावली आहे. अलीकडेच झालेल्या पदवीधर निवडणुकीमुळे कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवार काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज नाशिकमध्ये पक्षीय नेते मंडळीसह केंद्रीय मंत्री, राज्य मंत्र्यांची मांदियाळी असून शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह […]

शरद पवार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे त्रैवार्षिक अधिवेशन शुक्रवारी गोल्फ क्लब मैदानावर दुपारी साडेबाराला होणार आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला त्यांनी उपस्थिती लावली आहे. अलीकडेच झालेल्या पदवीधर निवडणुकीमुळे कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवार काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आज नाशिकमध्ये पक्षीय नेते मंडळीसह केंद्रीय मंत्री, राज्य मंत्र्यांची मांदियाळी असून शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची नेते मंत्र्यांची उपस्थिती नाशिकमध्ये असणार आहे.

महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या हस्ते झाले आहे. तसेच राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच नाशिक शहरात अधिवेशनाच्या निमित्ताने येत आहेत. तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांचा दुपारी दोन वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number