पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र

आर्थिक घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी लोकसभेत काँग्रेस मार्फत करण्यात येत आहे. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले,केंद्रीय तपास यंत्रणांनाकडून अनेक मोठमोठ्या नेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. कारवाई करणाऱ्या संस्थांमध्ये ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स सारख्या संस्थांचा समावेश आहे. या तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. या तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या आदेशानुसार […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र

आर्थिक घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी लोकसभेत काँग्रेस मार्फत करण्यात येत आहे. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले,केंद्रीय तपास यंत्रणांनाकडून अनेक मोठमोठ्या नेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. कारवाई करणाऱ्या संस्थांमध्ये ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स सारख्या संस्थांचा समावेश आहे. या तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. या तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या आदेशानुसार काम करतात, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय.

मोदी म्हणाले, “ सभागृहात भ्रष्टाचार विरोधात तपास करणाऱ्या तपास यंत्रणांबद्दल बरंच काही बोललं गेलं. मी एक पाहिलं की, अनेक विरोधी पक्ष इतरांच्या सुरात सूर मिसळत होते. त्यांनी ईडीचे धन्यवाद मानले पाहिजेत मला वाटत होतं, देशाची जनता, देशाच्या निवडणुकीचे निकाल अशा लोकांना जरुर एका मंचावर आणेल. पण तसं झालं नाही. पण या लोकांनी ईडीचे धन्यवाद मानले पाहिजेत. कारण ईडीच्या कारणास्तव ते एकाच मंचावर आले आहेत”, असा टोला मोदींनी लगावला. ईडीने या लोकांना एका मंचावर आणलं आहे. त्यासाठी जे काम देशाचे मतदार करु शकले नाहीत, ते ईडीने केलं”, असा चिमटा नरेंद्र मोदी यांनी काढला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number