वरळीत मंगळवारी, ७ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर शाब्दिक टोलेबाजी केली आहे.
“आधी आपला आवाज सुधार, अजून कंठ फुटलेला नाही”, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केले आहे. “आम्ही तुला २०२४ मध्ये आमदार ठेवणार नाही, पुढच्या वेळी निदान पुरुषी आवाज असलेला आमदार तर देऊ”, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी “वरळीतून लढण्याची मुख्यमंत्री शिंदेंची हिंमत नाही, मी शिंदें विरोधात ठाण्यातून लढण्यास तयार आहे”, असे विधान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. तसेच, “वरळीत शिंदें- फडणवीसांना जोडीने सभा घ्यावी लागते यातच माझे यश आहे”, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेत केले होते. आदित्य ठाकरेंच्या याच वक्तव्यावर नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.