टिळक कुटुंबीयांबाहेरील उमेदवार दिल्याने सध्या टिळक कुटुंबीय भाजपवर आहे नाराज आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या पदयात्रेतही शैलेश टिळक अनुपस्थित होते. यावरून टिळक नाराज असल्याच्या वार्ता राजकीय वर्तुळात रंगत आहे. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारण्यात आलं होतं.
त्यावर टिळक कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारीही टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने नाराज आहेत. हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीला टिळक कुटुंबीय, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने ही नाराजी अधिकच उघड झाली आहे. परंतु शैलेश टिळक यांनी मी नाराज नसल्याचं सांगून सर्व चर्चाना पूर्ण विराम दिला आहे.
शैलेश टिळक म्हणाले, “मी नाराज अजिबात नाही आहे. पहिलेच आम्ही आमची भूमिका जाहीर केली होती. राजकारणात अशी घटना घडल्यानंतर घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते म्हणून आम्ही उच्च इच्छा प्रदर्शित केली होती. ताईंचे राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी संधी मिळावी, परंतु पक्षाने वेगळा विचार केला असावा नक्कीच त्यांनी यासंर्भात अभ्यास करून हा निर्णय घेतला असावा. तो निर्णय आम्ही सर्वप्रथम मान्य केला आहे त्यात नाराज होण्याचे काही कारण नाही.” असे शैलेश टिळक म्हणाले.