मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या आवाहनाकडे मविआकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना निवडणूक बिनविरोध करावी अशी विंनती केली. परंतु काँग्रेसने आपली या विनंतीला मान न देता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांनी ट्विट करत पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी ट्विट केले आहे. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.