कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जय्यत तैयारी सुरू केली आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार इच्छुक होते. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा व चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. गेली अनेक दिवस कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी चर्चेला उधाण आले असताना भारतीय जनता पक्षाने कसबा आणि चिंचवडमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने टिळक घराण्यात उमेदवारी न देता दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात कसब्यात बदल करण्यात आला असून चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.