अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत राष्ट्रवादीला राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवता आले नाही. शरद पवारांसारखे दिग्गज नेतृत्व असूनही आलेल्या या अपयशावरून विरोधक राष्ट्रवादीला डिवचत असतात. दरम्यान, २००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. २००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. यावेळी या पक्षाला […]

अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत राष्ट्रवादीला राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवता आले नाही. शरद पवारांसारखे दिग्गज नेतृत्व असूनही आलेल्या या अपयशावरून विरोधक राष्ट्रवादीला डिवचत असतात. दरम्यान, २००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता.

२००४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. यावेळी या पक्षाला मुख्यमंत्री पदही मिळाले होते. परंतु, राष्ट्रवादीने तेव्हा मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले. २००४ साली मुख्यमंत्रीपद घेतले नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

पक्षाने कुठल्या चुका केल्या आणि त्यामुळे काय नुकसान झाले? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, ‘ते सांगण्यात आता अर्थ नाही. एक मात्र मोठी चूक वाटते ती म्हणजे २००४ साली संधी मिळूनही पक्षाने मुख्यमंत्रिपद सोडायला नको होते. मी खरे तेच सांगतोय. आर. आर. पाटील, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचे होते किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात कोण होते त्यांना मुख्यमंत्री करायचे होते. पण २००४ ला जर मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला घेतले असते तर शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता’, असे अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी नशिबाची साथ आवश्यक असल्याचेही अजित पवार म्हणाले, आपण कितीही काही म्हटलं तरी प्रयत्न करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. पण कुठेतरी नशिबाची पण साथ लागते. सगळ्याच क्षेत्रात ती लागते. देशातही पंतप्रधानपदाच्या योग्यतेची अनेक माणसे होती, पण सगळ्यांनाच ते पद मिळते का? अगदी महापौरपद असेल, मुख्यमंत्रिपद असेल, किंवा आणखी कुठली पदे असतील. सगळ्याच ठिकाणी असे होते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number