‘सत्यजीत तांबे काँग्रेसबरोबरच राहतील’

नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच नागपूर, कोकण आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी काल मतमोजणी सुरू झाली. यापैकी नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल रात्री उशिरापर्यंत लागले. अमरावतीत मविआपुढे तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला असून शुभांगी पाटील यांचा पराभव झालेला आहे. या पार्श्वभूमीवर […]

‘सत्यजीत तांबे काँग्रेसबरोबरच राहतील’

नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच नागपूर, कोकण आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी काल मतमोजणी सुरू झाली. यापैकी नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल रात्री उशिरापर्यंत लागले. अमरावतीत मविआपुढे तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला असून शुभांगी पाटील यांचा पराभव झालेला आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीवरून भाजपला लक्ष्य केले आहे. तसेच, अमरावतीत अजूनही मतमोजणी सुरूच असून, भाजपचा उमेदवार पीछाडीवर आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘विधान परिषदेच्या पाचपैकी फक्त एका जागेवर भाजपचा विजय झाला; परंतु तोसुद्धा एक उमेदवार उधार-उसनेवारीचा आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले राजकारण लोकांना मान्य नाही. लोक निवडणुकीची वाट पाहात आहेत. आम्ही मविआ म्हणून एकीने लढणार आहोत. नाशिकमध्ये कोणी दावा करू नये, तिथे सत्यजित तांबे जिंकले आहेत. आम्ही शुभांगी पाटलांना पाठिंबा दिला होता आणि त्या झाशीच्या राणीसारख्या लढल्याही. तसेच, मला पूर्ण खात्री आहे, सत्यजित तांबे काँग्रेसबरोबरच राहतील.’असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number