नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत मविआचे सुधाकर अडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव करत विजय दणदणीत मिळवला आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४, हजार ७१ तर गाणार यांना ६ हजार ३०९ मते मिळाली. एकूण ७ हजारांहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर होते. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.
दहा वर्षांपासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली. भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा देखील घेतल्या होत्या. मात्र मतमोजणी सुरु झाल्या नंतर पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मागील दोन टर्म नागो गाणार हे आमदार होते त्यामुळे तेच हॅटट्रिक करतील असा अतिआत्मविश्वास भाजपात होता. पण, नागपुरात नागो गाणार यांना पराभूत करत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झालेला आहे.