कोल्हापूर जिल्हा बँकेचे ५ कर्मचारी ईडीच्या ताब्यात

कोल्हापूर जिल्हा बँकेची दोन दिवसांपासून ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल झाले.विशेष म्हणजे ईडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचारी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये डॉ. अशोक माने (मुख्य कार्यकारी अधिकारी), आर. जे. पाटील (व्यवस्थपक साखर कारखाना विभाग), अल्ताफ […]

कोल्हापूर जिल्हा बँकेचे ५ कर्मचारी ईडीच्या ताब्यात

कोल्हापूर जिल्हा बँकेची दोन दिवसांपासून ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल झाले.विशेष म्हणजे ईडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचारी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये डॉ. अशोक माने (मुख्य कार्यकारी अधिकारी), आर. जे. पाटील (व्यवस्थपक साखर कारखाना विभाग), अल्ताफ मुजावर (उप व्यवस्थापक साखर कारखाना विभाग), सचिन डोंनकर (निरीक्षक साखर कारखाना कर्ज वाटप विभाग) आणि राजू खाडे (निरीक्षक) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.

१० ते १५ अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सकाळी आठ वाजल्यापासून तपासणी सुरू केली होती. अवघ्या वीस ते एकवीस दिवसांत ईडीने पुन्हा जिल्हा बँकेत छापा मारला. जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची तब्बल ३६ तास चौकशी करत अखेर ईडीने कागदपत्रांसह बँकेच्या ५ अधिकाऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number