राज्यसेवा आयोगाचे उमेदवार पुन्हा रस्त्यावर

२०२५ पासून राज्यसेवा आयोगायचा नवा अभ्यासक्रम लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यसेवा आयोगाच्या उमेदवारांनी राज्यभरात आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत शिंदे फडणवीस सरकारने या उमेदवारांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र तरीही आज राज्यसेवा आयोगाचे उमेदवार आंदोलन करणार आहेत. सकाळी १० वाजेपासून पुण्यातील अलका चौकात हे आंदोलन करणार आहेत. नवा अभ्यासक्रम हा यंदाच म्हणजे २०२३ पासूनच […]

राज्यसेवा आयोगाचे उमेदवार पुन्हा रस्त्यावर

२०२५ पासून राज्यसेवा आयोगायचा नवा अभ्यासक्रम लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यसेवा आयोगाच्या उमेदवारांनी राज्यभरात आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत शिंदे फडणवीस सरकारने या उमेदवारांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र तरीही आज राज्यसेवा आयोगाचे उमेदवार आंदोलन करणार आहेत. सकाळी १० वाजेपासून पुण्यातील अलका चौकात हे आंदोलन करणार आहेत.

नवा अभ्यासक्रम हा यंदाच म्हणजे २०२३ पासूनच लागू करावा, यासह केंद्रीय आयोगाच्या धर्तीवर राज्यसेवा आयोगाची परीक्षा घेतली जावी, अशी नवी मागणीकरत हे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरणार आहेत. या नव्या मागणीनंतर उमेदवारांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. एका गटाकडून नवा अभ्यासक्रम हा २०२३ पासून लागू करावा अशी मागणी होतेय तर दुसऱ्या गटाकडून नवा अभ्यासक्रम हा २०२५ पासूनच लागू करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number