अदाणी समुहाने नुकताच अदाणी एंटरप्राइजेज याचा एफपीओ जारी केला होता. हिंडररबर्ग आणि अदाणी वादामधे आज अदानीला जोरदार फटका बसला.गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी अदाणी एंटरप्रायझेसने एफपीओ बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अदाणी एंटरप्रायझेसने २०,००० कोटी रुपयांचे फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग एफपीओ रद्द केल्याची घोषणा केली आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घोषणा करताना कंपनीने सांगितले की या एफपीओचे सर्व पैसे गुंतवणूकदारांना परत करणार आहेत. अदाणी समुहानं नुकताच अदाणी एंटरप्राइजेज याचा एफपीओ जारी केला होता.
अदाणी समुहानं नुकताच अदाणी एंटरप्राइजेज याचा एफपीओ जारी केला होता. ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणूकधारकांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. पण कंपनीनं एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अदाणी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली, कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला असून आता अदानी समूहाकडून गुंतवणूकधारकांना पैसे परत दिले जाणार आहेत.
आम्ही एफपीओतून मिळालेली रक्कम परत करणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित व्यवहार समाप्त करणार आहोत. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत अदाणी समुहाने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ईएसजीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला, असे गौतम अदाणी समूहाकडून सांगण्यात आले आहे.