आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. यावेळी शेती क्षेत्रासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. तसेच कृषी लोन 20 लाख कोटींनी वाढवण्यात आल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले आहे.
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरवात झाली असून संपूर्ण देशाचे सरकार काय घोषणा करणार याकडे लक्ष लागलेले आहे. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यावेळी सरकारकडून अतिशय मोठ्या घोषणा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.