1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अर्थसंकल्पातून बड्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा बजेट आहे. गेल्या दोन वर्षापासून पेपरलेस बजेट सादर केला जात आहे. यावेळीही पेपरलेस बजेट सादर केला जाईल. आजच्या अर्थसंकल्पातून देशाचा आर्थिक विकास आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत मोठे निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.
या अर्थसंकल्पातून शेती, शिक्षण, आयकर रचना, आरोग्य आणि सरकारी योजना आदींवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्य सेवेपर्यंतच्या नियमातही बदल होण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधीत वाढ करणे, मध्यम वर्गाला आयकरातून सूट देणे निर्णय आज होऊ शकतात. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजेटमधून घोषणांचा वर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसाठी आजच्या बजेटमधून काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतातमुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलबाबत काही घोषणा होण्याची शक्यता आहे.