चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक – महेश कोठारे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला, याप्रसंगी बोलत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कवट्या महाकाळचे’ गुपित उलघडले.
डॅम इट म्हणत कधी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे तर कधी प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारे, महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरेच काही’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा बुधवार, दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृह (दादर) येथे पार पडला. याप्रसंगी फडणवीसांनी पुस्तकाविषयी बोलताना ओघात धडाकेबाज चित्रपटातील ‘कवट्या महाकाळ’ या पात्राच्या जन्माचे गुपित उलघडले आहे. कवट्या महाकाळ हे पात्र सांगली जिल्ह्यातील ‘कवठे महाकाळ’ या ठिकाणावरून जन्माला आलं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.
तसंच कवट्या महाकाळ सोबतच बहुतेक चित्रपटात महेश कोठारेंच्या तोंडात असलेलं ‘डॅम इट’ कुठून जन्माला आलं हे गुपितही या पुस्तकात उलघडलं आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.